KasaKay Marathi News.com

KasaKay Marathi News.com
🙏वाचकांनी आमच्या प्रयत्नांना योग्य न्याय द्यावा,हीच अपेक्षा🙏

1 एप्रिलपासून बदलणार 'हे' 10 नियम, | income Tax Rules:-आयकराशी संबंधित 'हे' 7 नियम 1 एप्रिलपासून बदलणार | April

एप्रिलपासून बदलणार 'हे' 10 नियमजाणून न घेतल्यास तुमचं बजेट बिघडणार; income Tax Rules: 

what will cost more and become cheaper from 1 April 

एप्रिल महिना सुरु होताच काही नवीन नियम लागू होणार आहोत. यामध्ये शेअर बाजारगुंतवणूकआयकरसह तुमच्या खर्चांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे सोन्याचे हॉलमार्किंग संबंधित नियम बदलतील. तसंच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीसह अनेक बदल कोणते हे आपण जाणून घेऊया...

1 एप्रिलपासून बदलणार 'हे' 10 नियम, | income Tax Rules

1 april  उद्यापासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात; काय स्वस्त होणार, काय महाग? वाचा संपूर्ण यादी
 

🔴होलमार्किंग नियम-

एप्रिलपासून देशभरात फक्त सहा अंकी 'हॉलमार्क अल्फान्यूमेरिक युनिक आयडेंटिफिकेशनक्रमांक असलेले सोनेच विकले जाईल. म्हणजेच 31 मार्चनंतर सोनार जुने हॉलमार्क असलेले दागिने विकू शकणार नाही."new income tax rule"

🔴ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ-

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी कमाल ठेव मर्यादा 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ मिळणार आहेत. त्याच वेळी एकल खात्यांसाठी मासिक उत्पन्न योजनेसाठी कमाल ठेव मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये करण्यात आली आहे.

🔴एलपीजी,सीएनजीकिंमतींमध्ये 

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या तेलाच्या किंमतींमध्ये बदल करतात. यामुळे यावेळी तेलाच्या दरात वाढ होऊ शकते. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतात.

🔴सोन्याच्या रुपांतरावर कोणते ही भांडवली कर लागणार नाही

2023 च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलं की, 1 एप्रिलपासून तुम्ही भौतिक सोन्याचं ई-गोल्डमध्ये रुपांतर केलं किंवा ई-गोल्डचं भौतिक सोन्यात रुपांतर केलं तर त्यावर कोणताही भांडवली नफा कर भरावा लागणार नाही. 

"new income tax rule"

🔴 आधार-पॅन लिंक आवश्यक

तुम्ही तुमचं आधार-पॅन लिंक केलं नसेल तर 31 मार्चपूर्वी करा. असं न केल्यास 1 एप्रिलपासून पॅन निष्क्रिय होईल.

Click Here Link - Link 👈

🔴 डिमॅट अकाउंटमध्ये नॉमिनी आवश्यक

डिमॅट अकाउंटमध्ये नॉमिनी ठेवणं आवश्यक असणार आहे. या नामांकनाची अंतिम मुदत 31 मार्च 2023 आहे. तुम्ही नॉमिनी न ठेवल्यास 1 एप्रिलपासून ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट गोठावलं जाईल.

🔴एप्रिल 2023 मधील बँकांच्या सुट्ट्या

एप्रिल महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या असणार आहे. महिन्याची सुरुवातच सुट्टीने होतेय. सात विकेंडच्या सुट्ट्या आणि आंबेडकर जयंती, महावीर जयंती, ईद अशा सुट्ट्यांमुळे बँक 15 दिवस बंद असेल.

"new income tax rule"

🔴दिव्यांगांसाठी UDID अनिवार्य

17 सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना 1 एप्रिलपासून केंद्राने जारी केलेला युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (UDID) क्रमांक देणे अनिवार्य असेल. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे यूडीआय कार्ड नसेल त्यांना अपंगत्व प्रमाणपत्रासह यूडीआयडी नोंदणीक्रमांक.

'what will cost more and become cheaper from 1 April'

🔴कर स्लॅब बदलतील

1 एप्रिलपासून करदात्यांनी जुन्या कर प्रणालीची निवड केली नाही, तर त्यांचे कर स्लॅब बदलणार आहेत. अशा प्रकारे, कर भरणामध्येही बदल होतील. नवीन प्रणाली अंतर्गत स्लॅब खालीलप्रमाणे आहेत.

0 ते 3 लाख - कर नाही
3
ते 6 लाख - 5 टक्के
6
ते 9 लाख - 10 टक्के
9
ते 12 लाख - 15 टक्के
12
ते 15 लाख - 20 टक्के

🔴NSE वरील ट्रांझेक्शन फिसमधील 6% वाढ मागे

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने रोख इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील ट्रांझेक्शन फिसमध्ये 1 जानेवारी 2021 पासून सहा टक्के वाढ केली होती. आता 1 एप्रिलपासून ही वाढ मागे घेण्यता आली आहे.

"new income tax rule"



Post a Comment

0 Comments