KasaKay Marathi News.com

KasaKay Marathi News.com
🙏वाचकांनी आमच्या प्रयत्नांना योग्य न्याय द्यावा,हीच अपेक्षा🙏

MJPJAY महात्मा फुले जनआरोग्य योजना Jyotiba Phule Mahatma Scheme Eligibility ?

 MJPJAY: जाणून घ्या! महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना,

 Jyotiba Phule Mahatma Scheme Eligibility ?


राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2 जुलै 2012 रोजी राज्यातील 8 जिल्ह्यांत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली.

21 नोव्हेंबर 2013 रोजी या योजनेचा राज्यातील 28 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला. ' '(MJPJAY) that can be used to describe something. सध्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना होत आहे.

MJPJAY: What do you mean by "to be"? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागते? व या योजनेचे लाभार्थी कोण आहेत हे जाणून घेऊया...

MJPJAY -

राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार पूर्णतः मोफत उपलब्ध करवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवली जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये आहे.


योजनेचा लाभ कुणाला?

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे पिवळी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय अन्न योजना, 
अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांसह नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबही या योजनेचे लाभार्थी आहेत.
शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथालयातील मुले, शासकीय वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषांनुसार पात्र पत्रकार व त्यांचे कुटुंब तथा कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.


योजनेच्या लाभासाठी कशी करावी नोंदणी?

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयांत आरोग्य मित्र असतात. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या सर्वच रुग्णालयांत हे उपलब्ध असतात. आरोग्यमित्र रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करतात. तसेच रुग्णालयात उपचार घेताना योग्य ती मदतही करतात. 

"Jyotiba Phule Mahatma Scheme Eligibility"

ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र. हे दोन्ही ओळखपत्र नसतील तर शिधापत्रिका किंवा छायाचित्रासह असणारे कोणतेही ओळखपत्र उदा. आधार कार्ड, निवडणूक ओळख पत्र, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उताराही या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामी येतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने निर्धारित केलेली योग्य ती ओळखपत्रे ग्राह्य धरली जातात.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी 34 निवडक विशेष सेवेंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया तथा 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत कोरोनावरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा राज्यातील लक्षावधी नागरिकांनी लाभ घेतला आहे.

 "Scheme"

Mahatma Jyotiba Phule Scheme Eligibility ('MJPJA') -

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील नोंदणीची पात्रता ही खालीलप्रमाणे असणार आहे.
   

पात्रता पाहण्यासाठी इथे क्लिक करा.



योजने अंतर्गत विमा संरक्षण –

या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति वर्ष दीड लाखापर्यंत चे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष अडीच लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तीला वरील योजनेचा लाभ घेता येणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोणते उपचार समाविष्ट असणार आहेत ? (List of diseases from the Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana)

या योजनेअंतर्गत विशेष सेवांतर्गत ७७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश असणार आहे. सदर योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे सेवा व उपचार असणार आहेत.

सर्वसाधारण शस्त्रक्रिया
काम, नाक घसा शस्त्रक्रिया
नेत्ररोग शस्त्रक्रिया
स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र
अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
पोठ व जठार शस्त्रक्रिया
कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
बालरोग शस्त्रक्रिया
प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया
मज्जातंतूविकृती शास्त्र
कर्करोग शस्त्रक्रिया
वैद्यकीय कर्करोग उपचार
रेडीओथेरपी कर्करोग
त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
जळीत
पॉलिट्रामा
प्रोस्थेसिस
जोखिमी देखभाल
जनरल मेडिसिन
संसर्गजन्य रोग
बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
हृदयरोग
नेफ्रोलोजी
न्युरोलोजी
पल्मोनोलोजी
चर्मरोग चिकित्सा
रोमेटोलोजी
इंडोक्रायनोलोजी
मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
इंटरवेन्शनल रेडीओलोजी
विम्याचा हप्ता कोण देणार ?

या योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी विम्याचा हप्ता हा राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत करण्यात येतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोणती रुग्णालय समाविष्ट आहेत ?

या योजनेत शासकीय आणि निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची ३० पेक्षा अधिक खाटा असणारे असणाऱ्या निकषांवरून करण्यात आली आहे. लाभार्थी त्यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही रूग्णालयात त्यांचा उपचार करून घेऊ शकतो." MJPJAY"


"(MJPJA) महात्मा जोतिबा फुले आरोग्य "







Post a Comment

0 Comments