KasaKay Marathi News.com

KasaKay Marathi News.com
🙏वाचकांनी आमच्या प्रयत्नांना योग्य न्याय द्यावा,हीच अपेक्षा🙏

Mahajyoti Free Tablet Yojana | |दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी NEET, CET मोफत टॅब्लेट योजना

Mahajyoti Free Tablet Yojana | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी NEET, CET  मोफत टॅब्लेट योजना 



Mahajyoti Free Tablet Yojana
Mahajyoti-Free-Tablet-Yojana



केंद्र सरकार आणि राज्य शासन देशातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवित असतात.या योजनांपैकीच एक योजना म्हणजे महाज्योती फ्री टॅबलेट योजना (mahajyoti जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्थेसोबत मिळून इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची योजना सुरु केली आहे.
MH-CET / IEL / NEET या परीक्षांच्या २०२३ पूर्व तयारीसाठी इमाव (OBC), वी जा भ ज (VJNT), वि मा प्र (SBC) या प्रवर्गामधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

१०वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर, मेडिकलसाठी तयारी करायची असते परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नसते अशा विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेने ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षण उपक्रम सुरु केला आहे.

जर तुम्हाला फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घायचा असेल तर शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करायची सर्व पद्धत आम्ही खाली दिलेली आहे
आम्ही आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे आपण हा लेख जरूर वाचावा व या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा.
"mahajyoti tablet yojana"

फ्री टॅबलेट योजना 2023 लाभ (Benefits) कोणते?

1. विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि सीईट परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
2. तसेच या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी परीक्षेची पुस्तके, मोफत टॅबलेट आणि दररोज ६ जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे.

 

Mahajyoti Free Tablet Yojana


फ्री टॅबलेट योजना 2022 आवश्यक कागदपत्रे कोणती? (Documents Required) :

1. दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका
2. अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यासंबंधी कागदपत्रं
3. ओबीसी,भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
4. नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र आवश्यक आहे.

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2022 पात्रता (Eligibility) काय?

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
या योजेनेचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांने यावर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली हवी आणि अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
ओबीसी (OBC), भटक्या जाती-जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना या योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र आहेत.
शहरी विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत ७० % तर ग्रामीण, आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना ६०% गुण असणे आवश्यक आहेत. tablet yojana


फ्री टॅबलेट स्कीम चे कारण  काय?

महाज्योतीच्या या योजनेच्या माध्यमातून सन २०२१ मध्ये राज्यातील ११ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीईटी (CET) परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करणे हे या योजनेचे मुख्य कारण आहे.
दहावी नंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर (Engineering) आणि मेडिकलसाठी (Medical) तयारी करायची असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडे कोचिंग क्लासेस लावणं त्यांना शक्य होत नाही. अश्या गरीब विद्यार्थ्यांचेइंजिनीरिंग आणि मेडिकल मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाज्योती संस्थेने हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.


फ्री टॅबलेट योजनेचे रजिस्ट्रेशन (Registration) कुठे करायचे?

महाज्योतीच्या मोफत प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
त्यासाठी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in👈या ऑफिसिअल वेबसाईटवर जायचं आहे
तिथे नोटीस बोर्डवर क्लिक करून आपला प्रवेश अर्ज अपलोड करायचा आहे.



अधिक सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या  https://kasakaymarathinews.blogspot.com







Post a Comment

0 Comments