KasaKay Marathi News.com

KasaKay Marathi News.com
🙏वाचकांनी आमच्या प्रयत्नांना योग्य न्याय द्यावा,हीच अपेक्षा🙏

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची शुबमन गिलला बॉलिंग..! नेटकऱ्यांच्या ‘मजेशीर’ कमेंट; का ? पाहा !

IPL 2023 Arjun Tendulkar Bowling To Shubman Gill : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (GT vs MI) आमनेसामने आले. या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईचा प्रमुख गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला या सामन्यातही संधी देण्यात आली. मागील सामन्यात पंजाबविरुद्ध अर्जुनने एका षटकात 31 धावा दिल्या. त्यानंतर आजच्या सामन्यात तो खेळणार का, याबाबत संभ्रम होता. पण रोहितने त्याला संधी दिली "ipl"


अर्जुन तेंडुलकर आणि शुबमन गिल
अर्जुन तेंडुलकर आणि शुबमन गिल ipl2023


मैदानात उतरल्यानंतर मुंबई इंडियन्सकडून अर्जुनने पहिले षटक टाकले. गुजरात टायटन्सकडून शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सलामी दिली. अर्जुनसमोर शुबमन फलंदाजी करायला आला तेव्हा नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अर्जुन विरुद्ध शुबमन हा सामना पाहण्यासाठी चाहते वाट पाहत होते. आज त्यांची इच्छा पूर्ण झाली."ipl 2023"

अर्जुन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटर आहे. आणि सचिन तेंडुलकर ह्यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ मध्ये झाला. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज आहे. त्याने २० जानेवारी २०२१ मध्ये हरियाणा विरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून १५ जानेवारी २०२१ रोजी २०-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणामध्ये त्याने तीन षटकांत 34 धावा देऊन एक बळी घेतला.



नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया… 😂😂



दोन्ही संघांची Playing matches 

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा, शुबमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, रिले मेरेडिथ, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.

 हेही वाचा -  IPL 2023 : अर्शदीप सिंगने मोडलेल्या स्टम्पची किंमत ‘इतकी’ लाख..! BCCI ला जब्बर नुकसान | सिंग इज किंग 

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्ससमोर 208 धावांचे लक्ष्य ठेवले . गुजरात संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 207 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील गुजरात टायटन्सची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. याआधी या संघाने या मोसमात कोलकाताविरुद्ध 204 धावा केल्या होत्या. या सामन्यात गुजरात टायटन्सने शेवटच्या सहा षटकात 94 धावा केल्या. शुबमन गिलने सर्वाधिक 56 धावा केल्या. डेव्हिड मिलरने 46 आणि अभिनव मनोहरने 42 धावा केल्या. मुंबईकडून पीयुष चावलाने दोन बळी घेतले



Post a Comment

0 Comments