IPL 2023: अर्शदीप सिंगने मोडलेल्या स्टम्पची किंमत ‘इतकी’ लाख..!
शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या. मुंबईकडून तिलक वर्मा आणि टिम डेव्हिड क्रीजवर उपस्थित होते. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने तिलकला क्लीन बोल्ड केले. या यॉर्कर चेंडूवर अर्शदीप सिंगने मधला स्टम्प तोडला. यानंतर स्टम्प बदलण्यात आला. चौथ्या चेंडूवर अर्शदीपनेही नेहल वधेराला यॉर्कर टाकून मधला स्टम्प तोडला. यानंतर स्टम्प पुन्हा बदलण्यात आला. अशाप्रकारे अर्शदीपने शेवटच्या षटकात केवळ दोन धावा देत दोन महत्त्वाचे बळी घेतले.
215 धावांच्या लक्ष्यासमोर मुंबईने 19 षटकांत 4 गडी गमावून 199 धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. पंजाबच्या अर्शदीप सिंगसमोर मुंबईचा टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा क्रीझवर होते. पहिल्या चेंडूवर डेव्हिडने एकच घेतली, दुसऱ्या चेंडूवर डॉट होता.
तिसरा चेंडू अर्शदीपने फुलर लेन्थ यॉर्कर टाकला, टिळक बोल्ड झाला. अर्शदीपने चौथा बॉल खूप फुलर लेन्थ टाकला, यावेळी नेहल वढेरा बोल्ड झाला. फलंदाजांचे दोन्ही मधले स्टंप तुटले. अर्शदीपने शेवटच्या 2 चेंडूत केवळ एक धाव दिली आणि आपल्या संघाला 13 धावांनी सामना जिंकून दिला."Arshdeep Singh"
अर्शदीप सिंग ठरला मॅचचा किंग
Probably the most expensive over:Arshdeep Singh broke the middle stump twice - a set of LED stumps with Zing bails cost 30 Lakhs INR. pic.twitter.com/A0m0EHyGM8— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 22, 2023
आजकाल आयपीएलमध्ये एलईडी स्टंप वापरले जातात. एका स्टंपची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. अर्शदीपने लागोपाठच्या बॉल्सवर 2 स्टंप तोडले. अशाप्रकारे अर्शदीपने केवळ 2 चेंडूत आयपीएलचे 20 लाख रुपयांचे नुकसान केले. आयपीएल व्यवस्थापनासाठी त्याचे हे षटक कदाचित सर्वात महागडे षटक असेल, परंतु त्याने या षटकात केवळ 2 धावा दिल्या.
अर्शदीपची गोलंदाजी बघायाला मजा आली, पण त्यामुळे भरपूर नुकसान झाले. तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या या स्टम्पच्या सेटची किंमत सुमारे 35 ते 40 लाख रुपये आहे. या स्टम्पच्या सेटची किंमत संघाच्या मॅच फीएवढी आहे. एकदिवसीय सामने खेळणाऱ्या भारतीय संघाला सुमारे 60 लाख रुपये आणि टी-20 संघाला 33 लाख रुपये मिळतात. स्टम्पच्या सेटची किंमतही याच्या आसपास आहे.
सिंग इज किंग शो दाखवत अर्शदीपने मारली बाजी
Sam Curran gives the Purple Cap to Arshdeep Singh.A lovely picture! pic.twitter.com/3SAyUSCcGY— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 22, 2023
LED स्टम्प कोणी बनवला?
एलईडी स्टम्पचा शोध ऑस्ट्रेलियाच्या ब्रॉन्टे अकरमन यांनी लावला. त्यांनी डेव्हिड
लेगिटवुडसोबत व्यवसाय भागीदार म्हणून झिंग इंटरनॅशनलची स्थापना केली
आणि बिग बॅश लीग दरम्यान 2013 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्याची कल्पना
विकली. 2013 मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या T20 विश्वचषकादरम्यान आयसीसीने
त्याचा प्रयोग म्हणून वापर केला होता. ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कौनना शासना संबंधित नाही. कृपया मला ऑफिशियल वेबसाइट म्हणून मानू नकानी खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांका किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती जोडू नका. आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भात तक्रारीवर लक्ष देऊ. शकत नाही. आम्ही आमच्या सर्व.संबंधित तक्रारी योजनेबद्दल फेर किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाची ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकारांना. भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. !