Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला गुढी का उभारतात माहिती आहे

 का ? जाणून घ्या !

भारतीय संस्कृतीनुसार 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करुन नव्याने गोष्टींना सुरुवात करण्याची निश्चयाची गुढी उभारावी असं वयस्करांकडून सांगितलं जातं. याच साऱ्यासाठी गुढीपाडवा साजरा केला जातो.

गुढीपाडवा शुभ मुहूर्त :

यंदा 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10:52 पासून सुरु होईल आणि 22 मार्च 2023 रोजी रात्री 8:20 वाजता समाप्त होईल. तसेच गुढीच्या पूजेसाठी सकाळी 6:29 ते 7.39 पर्यंतची वेळ शुभ असेल.

Gudi Padwa
GudiPadwa 


Gudhi Padwa Significance In Marathi: यंदा गुढीपाडवा (Gudhi Padwa) 22 मार्च(22 March 2023) रोजी साजरा करण्यात येणार आहे. 


भारतीय संस्कृतीनुसार 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करुन नव्याने गोष्टींना सुरुवात करण्याची निश्चयाची गुढी उभारावी असं वयस्करांकडून सांगितलं जातं. याच साऱ्यासाठी गुढीपाडवा साजरा केला जातो. प्रत्येक घरामध्ये अंगणात किंवा शहरांमध्ये बाल्कनीत, दारांसमोर गुढी उभारली जाते. गुढी उभारताना एका उंच बांबूच्या काठीवर रेश्मी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, अंब्याची पानं, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदी अथवा पितळ्याचा गडू बसवला जातो. ही गुढी नव्या सुरुवातीबरोबरच स्नेह, विजय, आनंद आणि मांगल्याचं प्रतिक असल्याचं मानलं जातं. अनेक शुभेच्छांमध्ये विजयाची गुढी असा उल्लेख दिसून येतो. मात्र हा विजय नेमका कसला असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आपल्यापैकी अनेकांना चैत्र महिन्याची सुरुवात या दिवशी होते हे ठाऊक आहे पण गुढी उभारण्याचं कारण काय? यामागे इतर काही कारणं आहे का? असतील तर कोणती याबद्दल फारच कमी लोकांना ठाऊक आहे. त्यावरच टाकलेला प्रकाश.."GudiPadwa 2023"

रामायणानुसार महत्त्व...


रामायणानुसार याच दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला होता. वालीचा वध करुन रामचंद्रांनी जनतेला त्याच्या जाचामधून मुक्त केलं होतं. त्याचा विजयोत्सव या दिवशी साजरा केला जातो. रामचंद्रांनी वालीचा वध केला, असुरी शक्तींवर दैवी शक्तींनी मिळवलेल्या विजयाचं प्रतिक म्हणून घरोघरी गुढी उभारली जाते. विशेष म्हणजे याच दिवशी प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षांचा वनवासही संपल्याने या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो.'gudi padwa' 

गुढीपाडवा व हिंदु नववर्ष निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा .🚩

Share Maximum✅..